Breaking news

Maval News : संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप

तळेगाव दाभाडे : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना उद्योजक शंकरराव शेळके यांच्या हस्ते लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार सुनिल शंकरराव शेळके जनसंपर्क कार्यालय येथे वितरित करण्यात आले.

      आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार मावळ तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 64 लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र शनिवार (दि. 28) वाटप करण्यात आले. दिव्यांग, ज्येष्ठ निराधार अशा वंचित घटकांसाठी संजय गांधी निराधार सारख्या शासकीय योजना आधार ठरत आहेत. मात्र या योजनेच्या लाभासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिकांची दमछाक होते. ही गरज ओळखून सर्वसामान्यांसाठीच्या योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंपर्क कार्यालया मार्फत कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरून घेण्यात आले होते. व त्यातील गरजूंना प्रमाणपत्र मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

      पात्र लाभार्थ्यांमध्ये श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या 21 व संजय गांधी निराधार योजनेच्या 43 लाभार्थ्यांचा समावेश आहे. अशा शासकीय योजनेच्या लाभांमुळे गरजू व्यक्तींना आधार मिळतो ,असे मत उद्योजक शंकरराव शेळके यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आंदर मावळ अध्यक्षा उमा शेळके, रामनाथ गरुड, सचिन वामन, नबीलाल अत्तार, नितीन पिंगळे, दिनेश दरेकर, अरविंद पाटील आदी. उपस्थित होते.

इतर बातम्या