Breaking news

Shree Ekvira Devastan Trust l श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदी दीपक हुलावळे तर उपाध्यक्ष पदी मारुती देशमुख व सागर देवकर यांची एकमताने निवड जाहीर

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला - वेहेरगाव गडावरील श्री आई एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदी कार्ला गावातील दीपक निवृत्ती हुलावळे यांची तर उपाध्यक्ष पदी देवघर येथील मारुती रामचंद्र देशमुख व वेहेरगाव येथील सागर देवकर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. यासह देवस्थान ट्रस्टच्या मुख्य विश्वस्त पदी खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची निवड करण्यात आली. सचिव पदावर देवीचे मुख्य पुजारी असलेले नवनाथ देशमुख, खजिनदार पदी देवीची दैनंदिन पूजा अर्चा करणारे संजय गोविलकर, सह सचिव पदी महेंद्र देशमुख, सह खजिनदार पदी विकास पडवळ यांची एकमताने निवड करण्यात आली.

मावळ माझा न्युज चा वाॅटस्अप ग्रुप जॉईन करा

       मागील अनेक वर्षांपासून आई एकवीरा देवस्थानचा कारभार शासकीय यंत्रणा पहात होती. मागील वर्षी याठिकाणी सात विश्वस्तांनी निवड झाली होती तर मागील आठवड्यात भविकांमधून दोन विश्वस्त निवड करण्यात आली होती. या नऊ विश्वस्तांमधून आज पदाधिकारी निवड करण्यात आली. यानंतर आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये या निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा देणे व भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे याकरिता विश्वस्त मंडळ काम करेल. तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून याठिकाणी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो आराखडा येथील नूतन विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या समोर ठेवण्यात येईल व त्यानुसार विकास कामे केली जातील. विश्वस्त मंडळाला सोबत घेऊन येथील विकास केला जाणार आहे. 

मावळ माझा न्युज चा वाॅटस्अप ग्रुप जॉईन करा

     निवडीनंतर बोलताना, दीपक हुलावळे व सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले, विकास आराखड्यानुसार कामे होणार असली तरी आज मितीला येथे येणाऱ्या भाविकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नवनाथ देशमुख व मारुती देशमुख म्हणाले, मागील वर्षभरापासून काहीना काही अडचणींमुळे निवडणूक लांबणीवर पडत होती. गडावर येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी विश्वस्त मंडळ अस्तित्वात येणे गरजेचे होते. मागील काळात भाविकांची झालेली गैरसोय सर्वश्रुत आहे. यापुढे भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य दिले जाईल. विकास पडवळ व सागर देवकर म्हणाले, आई एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून देवीची व भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचे सोन करत भाविकांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार आहे.

मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, नंदकुमार पदमुले, तानाजी पडवळ, संदीप आंद्रे, शहाजी पडवळ, संतोष राऊत, सदाशिव सोनार, सुरेश कडू, बाळासाहेब गुंड, प्रशांत हुलावळे, सनी हुलावळे, संतोष हुलावळे, निवृत्ती देशमुख, गणेश देशमुख आदींनी निवनिर्वाचीत अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या भेटी घेत शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या वाचा

तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांचे निलंबन

टायगर पॉईंट येते हुक्का विकणाऱ्या दोघांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

मावळ तालुक्यातील राजपुरी गावातील ईशिता शिंदे आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 13 वी

भुशी धरणाचा विषय विधानसभेत गाजला; बंदी मागे घेण्याची आमदार सुनील शेळके यांची मागणी

निलंबित मुख्याधिकारी एन. के.पाटील यांच्या मालमत्तेची व कामकाजाची होणार चौकशी

इतर बातम्या