Breaking news

वाकसई चाळ येथील भरत विकारी यांचे निधन

लोणावळा : वाकसई चाळ येथील भरत भिकू विकारी यांचे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.

    त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. उद्योजक समिर विकारी यांचे ते वडील तर मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार विलास विकारी यांचे चुलते होत. वाकसई येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तेरावा विधी (माळेचा कार्यक्रम) 3 डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी वाकसई चाळ येथे सकाळी 8 वाजता होणार आहे.

इतर बातम्या