Breaking news

Samparc Good News : संपर्क चे दत्तात्रय चाळक यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

लोणावळा : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत मुख्याध्यापक हा पुरस्कार यंदा संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे येथील मुख्याध्यापक दत्तात्रय चाळक यांना देण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे अवर सचिव शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य दिपक शेलार, श्री भोसले, शिक्षणाधिकारी, सुनंदा वाखारे, प्रेरक व्याख्याते शशांक मोहिते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी राज्याचे सचिव शांताराम पोखरकर, प्रवक्ते महेंद्र गणपुले, अधिवेशन अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, राज्य उपाध्यक्ष मधुकर नाईक, आदिनाथ थोरात व चंद्रकांत मोहळ उपस्थित होते. तसेच संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे, शिवाजीराव किलकिले, अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड सर्व उपाध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, तालुका अध्यक्ष विठ्ठल कुंभार, संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी, रत्ना बॅनर्जी, अनुज कुमार सिंग, सतीश माळी, सर्व संस्थेतील कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ, मुख्याध्यापक संघाचे सर्व तालुक्यातील अध्यक्ष, सचिव तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या