Breaking news

सोमवारी 27 सप्टेंबर रोजी खालील लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार आहे

लोणावळा : मावळ तालुक्यातील खालील लसीकरण केंद्रांवर सोमवारी (27 सप्टेंबर) रोजी कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस उपलब्ध असणार आहे. मावळ तालुका आरोग्य विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

 COVISHIELD 1st & 2nd DOSE : प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव, Recreation hall तळेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा, टाकवे, कार्ला, येळसे, आढले, लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील शंखेश्वर, रेल्वे व एल अँन्ड रुग्णालय, प्राथमिक आरोग्य पथक खंडाळा, ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ, कान्हे याठिकाणी लस उपलब्ध असणार आहे.

   याव्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणारी उपकेंद्र व गावनिहाय लसीकरणाबाबत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे लस व मनुष्यबळ उपलब्धतेनुसार नियोजन करतील.

इतर बातम्या