Breaking news

कार्ला आरोग्य केंद्रातील 57 जणांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान

कार्ला (प्रतिनिधी) : संकटावेळी कुठलीही भिती मनात न ठेवता लोकांसाठी जो धावून येतो त्या व्यक्तीला लोकांचे भरभरून अर्शिवाद मिळतात असे गौरवोद्गार काढत आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते कार्ला आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर अशा 57 जणांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम शिवसेना कार्ला शाखेत घेण्यात आला.  

   या कार्यक्रमासाठी हिंगोली मतदार विधानसभा संघाचे आमदार संतोष बांगर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, कार्ला जिल्हा परिषद आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ भारती पोळ, उद्योजक करीमभाई, तालुका शिवसेना संघटक सुरेश गायकवाड, अंकुश देशमुख, उपतालुकाप्रमुख मदन शेडगे, युवासेना तालुका समन्वयक दत्ता केदारी, विजय तिकोणे, संतोष गिरी, सागर हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, विशाल हुलावळे, चंद्रकांत मडके, सचिन हुलावळे, सनी हुलावळे, सोनाली मोरे, वत्सला हुलावळे, रमेश जाधव, सतीश मोरे, अक्षय हुलावळे, आदेश हुलावळे, तुकाराम हुलावळे, दत्तु हुलावळे, जयवंत येवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले होते तर उपस्थितांचे आभार डाॅ प्रमोद ठोंबरे यांनी मानले.

इतर बातम्या