Breaking news

टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर महिंद्रा कंपनीकडून निवारा शेडची उभारणी

टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी बाहेर उभे राहणाऱ्या नागरिकांना ऊन पाऊस यापासून संरक्षण मिळावे याकरिता महिंद्रा ॲक्सेलो कान्हे यांच्या सीएसआर फंडातून निवारा शेड उभारण्यात आले आहे. 

    या शेडचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी कंपनीचे वाइस प्रेसिडेंट चिफ कमर्शियल दिवाकर श्रीवास्तव, प्लांट चिफ कान्हे लक्ष्मण महाले, प्लांट हेड श्रीनिवास गंधाले, आय.आर हेड संजय जोशी, कमर्शियल हेड जगदीश परब, प्रोडक्शन हेड वैभव चव्हाण, अभिजित जाधव, पुरुषोत्तम पांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा आरोटे, सरपंच भुषण असवले, उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, सदस्य सोमनाथ असवले, तालुका युवक अध्यक्ष कॉग्रेस अध्यक्ष विलास मालपोटे, पो.पाटील अतुल असवले, सदस्या सुवर्णा असवले, ज्योती आंबेकर, डॉ. तडवी, सुपरवायझर आनंद साबळे, आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना महिंद्रा कंपनीचे प्लांट हेड श्रीनिवास गंधाले म्हणाले, महिंद्रा समुह नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत अनेक ठिकाणी सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. यापुढेही टाकवे गावात सीएसआर फंडाच्या माध्यमातून विकासकामांना मदत केली जाईल.


इतर बातम्या