Breaking news

आत्मा अंतर्गत हरितगृह व शेडनेट तंत्रज्ञ या विषयावरील कौशल्य आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

पवनानगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व कृषी  विज्ञान केंद्र नारायणगाव व जय मल्हार फुल उत्पादक संघ, कडधे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प संचालक, आत्मा पुणे राजेंद्र साबळे, प्रकल्प उपसंचालिका पूनम खटावकर यांचे मार्गदर्शनखाली दि.24 व 25 सप्टेंबर रोजी हरितगृह व शेडनेट तंत्रज्ञ या विषयावरील कौशल्यधारित प्रशिक्षण कार्यक्रम कडधे येथे पार पडला.

    या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव चे शास्त्रज्ञ डॉ. बी.जी. टेमकर, हरितगृह उभारणी अभ्यासक राजकुमार देवधर, कृषी पर्यावेक्षक एन.बी साबळे, सहाय्यक शीतल गिरीगोसावी, राहुल घोगरे तसेच जय मल्हार फुल उत्पादक संघातील सर्व शेतकरी व पवनमावळ परिसरातील हरित गृहात फुले उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते.  

    यावेळी कृषी पर्यावेक्षक नंदकुमार साबळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. नियंत्रित शेतीचा इतिहास तसेच कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन करून गुलाब फुलशेती मधील गादी वाफे तयार करण्यापासून, औषध फवारणी करताना वापरावयाचे स्प्रे गण, त्यांचे विविध नोझल तसेच औषध फवारणी करताना घ्यावयाची काळजी, औषध फवारणीची वेळ, खत व्यवस्थापन, जैविक व रासायनिक पद्धतीने कीड व रोग नियंत्रण तसेच हरित गृहातील विविध आंतर मशागती याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

     हरितगृह अभ्यास राजकुमार देवधर यांनी हरितगृह उभारणी पासून त्याचे विविध प्रकार, त्याच्या विविध भागाची जसे प्लॅस्टिक पेपर, पडदे, फोगर्स व मिस्टर ड्रीप लाईन इत्यादीची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर हरितगृहातील गुलाब उत्पादन करताना येणाऱ्या विविध प्रश्नांवर शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली. यावेळी जय मल्हार फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष कृष्णा ठाकर, सतिश मोहोळ, सचिन मोहोळ, पांडुरंग राक्षे, पंकज ठुले, शाहिदास तुपे, अनिल ठाकर, भास्कर घरदाळे, प्रदीप आमले तसेच गुलाब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल गोसावी यांनी केले तर प्रस्ताविक सचिन मोहोळ यांनी केले तर आभार कृष्णा ठाकर यांनी मानले.

इतर बातम्या