Breaking news

भांगरवाडी रेल्वे गेट असून अडचण नसून खोळंबा; वाहतूककोंडीने नागरिक हैराण

लोणावळा : भांगरवाडी रेल्वे गेटमधील वाहतूककोंडीने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. हा रेल्वे गेट असून अडथळा नसून खोळंबा झाला आहे. दिवसेंदिवस ह्या गेटमध्ये वाहतूककोंडी वाढली असून नांगरगाव बाजुला महादेव मंदिरापर्यत व भांगरवाडी बाजुला गणपती मंदिराच्या पुढे जाणार्‍या वाहनांच्या रांगा आता नित्याच्या झाल्या आहेत. भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम देखील कोरोनामुळे लांबल्याने आजुन किती दिवस ह्या कोंडीचा सामना करावा लागणार हे रामभरोसे आहे.

    कुमार रिसाॅर्ट येथील एकमवे रस्त्याला पर्याय म्हणून तसेच वलवण, नांगरगाव, भांगरवाडी व आजुबाजुच्या गावांमधील नागरिक भांगरवाडी रेल्वे गेट मार्गे ये जा करत असतात. सध्या मात्र जीपीएस च्या जमान्यात गुगल मॅपद्वारे शेकडो पर्यटक वाहने या रेल्वे गेट मधून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने स्थानिकांना या कोंडीचा सामना करावा लागतो आहे. त्यातच वाहने पुढे काढण्याच्या नादात गेटच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहने पुढे आणली जात असल्याने नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल होत आहे. रेल्वे पोलिसांनी याठिकाणी दोन कर्मचारी नेमावेत अशी मागणी वारंवार होत असताना त्यांची देखील कायमस्वरूपी नियुक्ती होताना दिसत नाही. त्यातच सकाळ, दुपार व सायंकाळी अनेक रेल्वे गाड्या पास होईपर्यंत गेट बंद रहात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

इतर बातम्या