Breaking news

Body Building : API सुभाष पुजारी यांनी मानाचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब पटकावला

खोपोली (प्रतिनिधी) : पुण्यामध्ये सुरु असलेल्या 71 व्या आँल इंडिया पोलीस गेम 2022 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सुभाष पुजारी (महामार्ग पोलिस) यांनी 80 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक मिळवले, सोबतच "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स" हा भारतीय पोलीस दलामधील मानाचा किताब पटकावून सर्वोत्कृष्ट बॅाडी बिल्डर होण्याचा मान मिळविला. या कारणे देशभरात महाराष्ट्र राज्याची आणि अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली आहे. सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ व कोअर जिम - खारघर या ठिकाणी सराव करीत होते. या स्पर्धेसाठी 36 संघानी व 2500 खेळाडुंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी त्यांना वर्ल्ड बॉडी बिल्डींगचे सेक्रेटरी चेतन पाठारे, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग लिगल अँडव्हायझर विक्रम रोठे, साऊथ एशिया बॉडी बिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे, रागिणी पुजारी, सुदर्शन खेडेकर - डोंबिवली, सागर ढमाले इत्यादींचे  विशेष मार्गदर्शन लाभले. यापूर्वी सुभाष पुजारी यांनी जुलेै 2022 मालदिव येथे झालेल्या मिस्टर एशिया स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. ताश्कंद-उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले होते. तसेच सलग दोनवेळा भारत श्री व महाराष्ट्र श्री हा किताब सुद्धा त्यांनी मिळविला आहे. दरम्यान थायलंड पुकेट या ठिकाणी होणा-या "मिस्टर वर्ल्ड" स्पर्धेसाठी भारतीय संघातून त्यांची निवड करण्यातत आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते त्यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री चंदकांत पाटील, आरोग्यमंत्री गिरिष महाजन आदी उपस्थित होते. पोलीस महासंचालक रजनीश शेठ, हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त नवी मुंबई - बिपिनकुमार सिंग, अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य अनुपकुमार सिंह, पोलीस महानिरिक्षक (प्रशासन) जय कुमार, अप्पर पोलीस आयुक्त नवी मुंबई डाॅ. जय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त मुंबई शहर दिलीप सावंत, अतिरिक्त पोलीस कमिशनर ठाणे शहर संजय जाधव, आमदार रोहित पवार, सभागृह नेता पनवेल महापालिका परेश ठाकूर, विरोधी पक्षनेता पनवेल महापालिका प्रीतम म्हात्रे  तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

इतर बातम्या