Breaking news

Maval News : भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठानच्या वतीने इंदोरी किल्ल्यावर रक्तदान शिबिर

लोणावळा : भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठानच्या चवथ्या वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्त मावळातील इंदोरी किल्ल्यावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासह विविध कार्यक्रमांनी वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

     रक्तदान शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून वृषाली राजे पद्मसेन राजे दाभाडे सरकार, गोरक्षक शिवशंकर स्वामी, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष विनोद साबळे, शिवभक्त विजय तिकोणे, सह्याद्री प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष सचिन शेडगे उपस्थित होते. यावेळी सचिन शेडगे यांनी इंदोरी किल्याचा अहवाल सादर केला.   इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे, दुर्ग संवर्धन करणाऱ्या अनेक संस्था याप्रसंगी उपस्थित होत्या. तसेच भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान चे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

इतर बातम्या