Breaking news

Big Breaking : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पदाचा व विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 9.48 वाजता जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री पद व विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहिर केले. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात मोठा भुकंप म्हणावा लागेल. माझा शिवसैनिक जर माझ्या विरोधात मतदान करणार असले तर मला तो खेळ खेळायचा नाही. मी स्वतःहून पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना प्रमुखांनी ज्यांना मोठे केले त्या शिवसेना प्रमुखाच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचा आनंद कोणाला भेटणार असेल तर तो मला हिरावून घ्यायचा नाही. मला पदाची लालसा नाही, मला तुमचे महाराष्ट्रातील माझ्या मायबाप मराठी माणसाचे प्रेम हवे आहे असे भावनिक आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी यापुढे फक्त शिवसेनेसाठी काम करणार असल्याचे जाहिर केले.

     मागील दोन वर्ष कोरोनामध्ये गेले असे असताना देखील महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगले काम केले. कोरोनावर मात करताना शेतकरी कर्जमाफी, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण केले. जे दगा देणार… देणार असे सर्व म्हणत होते त्यांनी साथ दिली पण ज्यांना आपले मानले त्यांनी साथ सोडली याचे वाईट वाटते. मी पहिल्या दिवसापासून सांगतो तुम्ही परत या… समोर बसा बोला मार्ग काढू, कालही तेच सांगितले आजही तेच सांगतोय, पण पार माणुसकी विसरली, नाते तोडले.

    मी शिवसैनिकांना आवाहन करतो, उद्या त्यांना मुंबईत येऊ द्या, उद्या लोकशाहीचा नवा पाळणा हालणार आहे. ज्या मुंबईत विजयाचा गुलाल उधळला, त्याच मुंबईमध्ये रक्ताचे पाट वाहू द्यायचे का तर नाही ज्यांना जल्लोष साजरा करायचा त्यांना करू द्या… मी सांगतो, एकही शिवसैनिक तुमच्या आड येणार नाही. सर्व बाॅर्डर वरील बंदोबस्त काढून मुंबईत लावला जाईल, मुंबईत बंदोबस्त वाढविला जात आहे, शिवसैनिकांना घरातून बाहेर येऊ द्यायचे नाही असे नियोजन केले जात आहे.

      मला पदाचा स्वार्थ नसल्याने मी मुख्यमंत्री पदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा येत आहे. उद्यापासून शिवसेना भवनात बसणार, आपली शिवसेना पुन्हा नव्याने उभी करू, ज्यांना शिवसेनेने सर्वकाही दिले ते नाराज झाले व ज्यांना काहीच दिले नाही ते मातोश्रीवर येऊन साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत आहेत. हीच शिवसेनेची खरी ताकद आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मराठी माणसांचे आभार मानले.

इतर बातम्या