Breaking news

Karla - Vehergaon Road : 25 कोटी रुपयांच्या रस्ता काॅक्रिटीकरण कामाचे बुधवारी अजितदादांच्या हस्ते कार्ला फाट्यावर होणार भुमीपुजन

लोणावळा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या आई एकविरा मंदिर व वेहेरगाव गावापर्यत जाणारा कार्ला फाटा ते वेहेरगाव या रस्त्यांचे संपुर्ण काॅक्रिटीकरण केले जाणार आहे सुमारे 80 फुट रुंद व जवळपास अडीच किमी अंतराचा हा रस्ता असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सदर कामाचे भुमीपुजन बुधवारी (20 आँक्टोबर) रोजी दुपारी 3 वाजता केले जाणार आहे.

    मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रयत्नातून या कामासाठी 25 कोटी 51 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सदर रस्त्य‍ाचे काम झाल्यानंतर वेहेरगाव व दहीवली गावांचा कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न मिटणार आहे. महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेले आई एकविरा देवीचे मंदिर देखील वेहेरगाव गावातील डोंगरावर असल्याने वर्षभर याठिकाणी भाविकांची वर्दळ असते. वर्षभरात किमान 18 ते 20 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यामुळे सदर मार्गावर सतत वाहतूककोंडी होत असते. तसेच पावसाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर पाणी साचत असल्याने स्थानिक नागरिक व भाविकांना पाण्यातून प्रवास करावा लागतो.

   स्थानिकांची व भाविकांची होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी मोठा निधी या कामासाठी उपलब्ध करून घेतला आहे. हा रस्ता झाल्यानंतर येथील वाहतूककोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

इतर बातम्या