Breaking news

वळक गावात बुद्ध विहार बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न

वडगाव मावळ : नाणे मावळातील वळक गावात बुद्ध विहार बांधण्यात येणार असून या कामाचा भूमिपूजन समारंभ स्थानिकांच्या उपस्थितीत गुरुवार (दि.22) संपन्न झाला.

  आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून ग्रामविकास निधी 2023-24 अंतर्गत वीस लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीनुसार एक हजार स्क्वेअर फुटामध्ये आरसीसीचे बांधकाम होणार असून सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.

      या भूमिपूजन समारंभास सामाजिक कार्यकर्ते सनी जाधव, उपसरपंच सुनिल बांगर, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव बांगर, संदीप जाधव, अमोल थोरवे, मच्छिंद्र थोरवे, रोहिदास वाघमारे, सागर रणपिसे, प्रल्हाद जाधव, अर्जुन रणपिसे, राजेंद्र रणपिसे, बबन जाधव, गुलाब जाधव आदी ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.

इतर बातम्या