Breaking news

शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात भोंडल्याचा कार्यक्रम संपन्न

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

लोणावळा : विद्या प्रसारिणी संस्थेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच श्री विद्या बालक मंदिर भाजे येथे नवरात्री निमित्त भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्री गो.व्य. शिंगरे आणि कार्यवाह डॉ. श्री सतीश गवळी यांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा लाभल्या. या  निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर व सन्मान केला जावा म्हणून कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी वडगाव मावळ येथील अँड. सुधा डिमळे, भाजे गावच्या पोलीस पाटील उज्वला अंबुरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्राचार्या वर्षा क्षिरसागर मॅडम आणि बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका स्वाती रगडे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख अहिरे मॅडम, खैरे मॅडम यांच्या नियोजनातून हा भोंडल्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या इ. नववी आणि दहावी च्या विद्यार्थिनींनी केले. प्रमुख पाहुण्या अँड. डिमळे यांनी 1 ली ते 12 वी च्या सर्व विद्यार्थिनींना कायद्याचा स्वसंरक्षणासाठी योग्य वापर कसा करावा आणि दुरूपयोग कसा करू नये याविषयीचे अनमोल मार्गदर्शन केले. तसेच पोलीस पाटील अंबुरे यांनी मुलींना अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे तसेच मोबाईल, टिव्ही चा अतिवापर टाळणे याविषयी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या प्राचार्या क्षिरसागर व बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका रगडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थींनी भोंडल्याच्या गाण्यावर गरबा नृत्य व विविध खेळ सादर केले. उपस्थितांचे आभार शिक्षक प्रतिनिधी बनकर सर यांनी मानले.

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

इतर बातम्या