बापूसाहेब भेगडे यांच्या गाव भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद
तळेगाव दाभाडे : मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी घेतली असून, आमदार म्हणून निवडून देण्याचा विश्वास ठिकठिकाणी मतदारांकडून देण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या गावभेटीमध्ये तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा भेगडे यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने बापूसाहेब भेगडे यांचे पारडे दिवसेंदिवस अधिक जड होत चालले आहे.
कुसगाव, पाचाने, पुसाने, दिवड, ओवळे, राजवाडी, ढोणे, आढळे, उर्से, आंबेवाडी, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, बऊरवाडी, बेडसे, करंज, कडधे, येळसे, पवनानगर, आदी गावांमधील नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना महिला भगिनींनी औक्षण करत भेगडे यांना ‘विजयाचा तिलक’ लावला. युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहत बापूसाहेब भेगडे यांना विजयाचा विश्वास दिला. गावागावातील विविध मंदिरांमध्ये देवतांचे दर्शन घेत भेगडे यांनी आशीर्वाद देखील घेतले. भेगडे जागोजागी फटाक्यांच्या अतिशबाजीत जल्लोषात स्वागत केले.
कार्यकर्तेही दिवसरात्र भेगडे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून बापूसाहेब भेगडे यांनाच मतदान करावे, असे आवाहन करीत आहेत. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गणेश भेगडे म्हणाले, की संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बापूसाहेब भेगडे यांनी अनेक लोकोपयोगी कामे केलेली आहेत. बापूसाहेब भेगडे हे संतांच्या विचारांवर ठाम असणारे उमेदवार आहेत. भंडारा डोंगरावर डोंगर मंदिर प्रगतीपथावर असून या मंदिराच्या बांधकामावर बापूसाहेब भेगडे बारीक लक्ष ठेवून आहेत. राजकीय, शैक्षणिक, सहकार, अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी मोठे काम केलेले आहे मी केले ही प्रवृत्ती थांबवण्यासाठी बापूसाहेबांवर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही भेगडे यांनी केले
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरवात झाली आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत सातत्याने पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांचाही आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता सोबत असल्याने नक्कीच विक्रमी मताधिक्य मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा स्वतःला उमेदवार समजूनच काम करत आहेत.
_ बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा मतदारसंघ