Breaking news

Lonavala l लोणावळ्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल पेढे वाटप करून जल्लोष

लोणावळा : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेताच लोणावळा शहरामध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला.

      भाजपाचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव माजी, शहराध्यक्ष राजाभाऊ खळदकर, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, संजय गायकवाड, राजू परदेशी, सचिन गुप्ता, कमलशील सैगर, दीपक कांबळे, दिनेश ओसवाल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, गणेश गायकवाड, दत्तात्रय तांदळे, संतोष चोरडिया आदींनी चौकामध्ये जमत फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटत आनंद उत्सव साजरा केला.

    महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश मिळाले होते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकचा पक्ष होण्याचा मान मिळवला होता सोबतच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी देखील मोठे यश संपादित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे पाईक असलेले भाजप कार्यकर्ते यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र जमत विजय उत्सव साजरा करत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद साजरा केला.

इतर बातम्या