Breaking news

लोणावळ्यात कुरवंडे रोडवर शालेय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

लोणावळा : येथील कुरवंडे रोडवर मंगळवारी (दि.13) रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास ट्युशन वरून घरी जाणार्‍या एका शालेय विद्यार्थ्यांवर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला आहे. डोक्यात काहीतरी ठणक वस्तू मारल्याने सदरचा विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवी कलम 326, 506 प्रमाणे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर तानाजी फाटक (वय 15, रा. कुरवंडे लोणावळा ) असे या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी जखमी मुलाचे वडिल तानाजी फाटक यांनी तक्रार दिली आहे. तीन महिन्यापुर्वी फाटक यांच्या मुलांना विनाकारण काही युवक त्रास देत होते. याबाबत त्यांनी सदर मुलांना भेटून समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फाटक यांना मारण्याची धमकी दिली होती. तसेच तुमची मुले या रस्त्याला भेटली तर आम्ही त्यांना दाखवतो असे धमकावले होते. त्यानंतर मंगळवारी मयुर हा सायंकाळी ट्युशन वरून घरी येत असताना रात्रीच्या अंधारात ही घटना घडली आहे. जखमी मुलावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी फाटक यांनी दोन युवकांची संशयित म्हणून नावे दिली असून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरु आहे.

इतर बातम्या