Breaking news

तळेगाव स्टेशन परिसरात कृत्रिम पाणीटंचाई - राष्ट्रवादीचा आरोप; 7 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद तर्फे स्टेशन भागात कमी दाबाचे व अनियमित पाणीपुरवठा करून, जाणीवपूर्वक कृत्रिम पाण्याचा तुटवडा कर्मचारी यांच्या कडून केला जात असल्याचा आरोप करत तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढील सात दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मुख्याधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. तळेगाव स्टेशन भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी खरेदी करावे लागत आहे. सदरील प्रकार हा मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या बदली नंतर घडू लागले आहेत. सध्याचे नविन मुख्याधिकारी यांची अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर पकड नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे.

      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तळेगाव दाभाडे शहराचे शहराध्यक्ष गणेश काकडे आणि महिला अध्यक्ष शैलेजाताई काळोखे यांच्या नेतृत्वखाली याबाबतचे निवेदन उपमुख्याधिकारी यांना देण्यात आले. ह्या प्रसंगी शहर वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष खांडगे, कार्याध्यक्ष विशाल पवार स्टेशन विभाग अध्यक्ष करण शेळके, विद्यार्थी अध्यक्ष ओमकार जाधव, गाव विभाग अध्यक्ष हर्षद पवार, कार्याध्यक्ष धनराज माने, सोशल मीडिया अध्यक्ष गणेश निळकंठ, ज्येष्ठ नेते दिलीप खळदे, माजी नगरसेवक अरुण पवार उपस्थित होते.

इतर बातम्या