Breaking news

मोठी बातमी | भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी लोणावळ्यातील प्रकाश पोरवाल यांची नियुक्ती

लोणावळा : लोणावळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांची भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वाकोडकर यांच्या हस्ते त्यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी जळगावचे आमदार सुरेशमामा भोळे, महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. लोणावळा येथे पत्रकार परिषद घेत प्रकाश पोरवाल यांनी या नियुक्ती बाबत माहिती दिली.

     प्रकाश पोरवाल म्हणाले, मी शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मागील 10 वर्ष काम केले. याकाळात अनेक निर्णय शेतकरी वर्गासाठी करून घेतले. याची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर उद्योग आघाडीची मोठी जबाबदारी दिली आहे. केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत 13000 कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाकडे उपलब्ध आहे. या निधीचे वाटप करत महाराष्ट्रातील शेतकरी, युवा, महिला यांना उद्योजक बनवण्याचे माझे स्वप्न आहे. याकरिता मी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. 

       शिर्डी या ठिकाणी येत्या 10 फेब्रुवारी रोजी महिलांचा भव्य मेळावा आयोजित केला असून त्या ठिकाणाहून कार्याची सुरुवात केली जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत उद्योजक बनावे असे आवाहन पोरवाल यांनी केले आहे. महाराष्ट्रभरामध्ये भाजपाचे मोठे जाळी पसरले आहे स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत व गरजवंतन पर्यंत पोहोचवल्या जाणार आहे याकरता स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन या पुढील काळामध्ये काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या