Breaking news

Lonavala News | अनं... श्री स्वामी समर्थ मठाकडे जाणारा रस्ता झाला दुरुस्त

लोणावळा : नांगरगावातील श्री स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या जोड रस्त्यावर खोदकाम करत गटाराची क्रॉस लाईन टाकण्यात आली होती. मात्र हे काम झाल्यानंतर जुने पाईप तसेच रस्त्यावर टाकून ठेवण्यात आले असून खोदलेला रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नव्हता. यामुळे येथे सतत अपघात होत होते. रात्रीच्या वेळी अंदाज न झाल्याने दुचाकी वाहने खड्डयात आदळत होती तर चारचाकी वाहने रस्त्यावर टाकलेल्या जुन्या पाईपांना घासत होती. नांगरगाव येथील श्री स्वामी समर्थ मठ प्रसिद्ध असल्याने याठिकाणी दर गुरुवारी व आठवड्याचे इतर दिवस देखील स्थानिक व बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. या सर्वांना या नादुरुस्त रस्त्याचा त्रास सहन करावा लागत होता. 

       याबाबत 8 फेब्रुवारी रोजी “मावळ माझा न्युजने” छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करत हा रस्ता दुरुस्त होणार तरी केव्हा अशी विचारणा लोणावळा नगरपरिषदेकडे केली होती. त्याची तात्काळ दाखल घेत लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे, उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, बांधकाम अभियंता पी.एन. साठे यांनी आज एका दिवसात सदर ठिकाणी लीकेज असलेली पाईपलाईन दुरुस्त करत सदर रस्त्यावर डांबर टाकत तो दुरुस्त करून नागरिकांना दिलासा दिला आहे. या भागात राहणारे नागरिक व भाविक यांनी लोणावळा नगरपरिषदेसह मावळ माझा न्युजचे अभिनंदन केले आहे.

     

इतर बातम्या