Breaking news

लोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल शेडगे

लोणावळा : लोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल शेडगे यांची नुकतीच निवड करण्यात आली. शेडगे यांनी संघटनेच्या उपाध्यक्ष पदावर असताना केलेल्या कामाची दखल घेत त्यांच्यावर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

   अमोल शेडगे यांनी त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात टॅक्सी संघटनेचे प्रश्न सोडविण्यासाठी व टॅक्सी चालक आणि मालक यांच्या अधिकारासाठी अनेक वेळा उपोषण आणि आंदोलनही केले आहे. लोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेचा सध्या ऐरणीवर असणारा प्रश्न म्हणजे लोणावळा परिसरात ओला उबेर च्या वाहनांना लोणावळ्यातून हद्दपार करून स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक व मालकांना रोजगार मिळवून देणे तसेच त्यांच्या अधिकारासाठी वेळ आली तर ठोस पाऊल उचलले जाईल असा पवित्रा यावेळी बोलताना अमोल शेडगे यांनी घेतला.

   त्यावेळी लोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे उपाध्यक्ष हेमंत मेने, खजिनदार मंगेश कदम, सचिव अविनाश तिकोणे, नरेंद्र निकाळजे, राजू पटेल, किशोर पवार, लक्ष्मण दाभाडे, विष्णू शेळके, अतुल अंबोरे, राजू मराठे, सुधीर कोकाटे, नितीन गोणते व टॅक्सी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल शेडगे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

इतर बातम्या