Breaking news

लसीचा डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्या; पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवाशी संघटनेची मागणी

पिंपरी चिंचवड : ज्या नागरिकांनी शासनाच्या लसीकरण मोहिमेत सहभाग घेत लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस घेतलेला आहे. त्या प्रवाशांना लोकल रेल्वेमधून प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    मागील दिड वर्षापासून राज्यातील जनता कोरोना महामारीचा सामना करत आहे. त्यातच सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे प्रवास बंद करण्यात आल्याने नोकरी टिकविण्यासोबत प्रवासासाठी कष्टकरी जनता कसरत करत आहे.

   कोरोनाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार देखील आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि सर्वसामान्य नागिरकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करून त्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवित आहे. या सोबतच ज्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरळीत चालू ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे आणि या सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना कामावर येण्या जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने देखील लोकल सेवा सुरू ठेवून सहकार्य केले आहे. त्याच धर्तीवर ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यांना लोकल प्रवासाची मुबा द्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने अध्यक्ष ईक्बाल मुलाणी यांनी केली आहे.

    मुलाणी म्हणाले कोरोनामुळे अनेक व्यावसाय बंद पडले आहे. काही ठिकाणी कामगारांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. अशातच प्रवासाची सुविधा असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने नागरिकांच्या पगारातील निम्मा भाग हा प्रवासावर खर्च करावा लागत असल्याने वाढत्या महागाईत कष्टकरी जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीचा सहानुभूतिपूर्ण विचार करत ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांना प्रवासीची मुबा द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

इतर बातम्या