Breaking news

50 वर्षांनी दहावीच्या वर्गातील विद्यार्थी भेटले आणि आजी आजोबा झालेल्या मित्रांचे बोल अबोल झाले

लोणावळा : पुण्यातील हडपसर येथील साधना विद्यालयातील दहावीचे 1972 च्या बॅच चे विद्यार्थी स्नेहमेळाव्यात भेटले. आता आजी आजोबा झालेल्या सर्व मित्रांचा आनंद काही औरच होता. पुन्हा 50 वर्षांपूर्वीच्या काळात अलगद स्मृती गेल्या आणि एकमेकांच्या ओळखी पुन्हा करू लागले.

    योगायोग होता माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचा वाट्सअप ग्रुप बनला आणि पंन्नास वर्षानी एकमेकांना भेटण्याचा योग आला. त्यावेळची एस.एस.सी म्हणजे अकरावीला होत। सर्वच हुशार विद्यार्थी आता हे हुशार  विदयार्थी कुणी डॉक्टर, कुणी वकील, इंजिनियर, शिक्षक अधिकारी, कलाकार, व्यवसाईक तर कुणी प्रगतीशील शेतकरी झाले होते. सर्व एकत्र आले आणि मग आठवणीना उजाळा देत स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम सुरु झाला. तेव्हाच्या मुली आताच्या आजिबाईना खूप वर्षानी माहेरी आल्याचा आनंद मिळाला… आणि मग काय.. खेळ गाणी गप्पाटप्पा स्नेहभोजन असा कार्यक्रम रंगला.. 

     सुरेश कोद्रे, अनिल घुले आदींनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा पवार यांनी केले. रवींद्र मोरे यांनी बासुरी वादन केले. दिवंगत मित्र आणि शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनिल वाघ यांनी आभार मानले. या स्नेह मेळाव्यात 50 वर्षांनी जुन्या मित्रांना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

इतर बातम्या