आचारसंहितेच्या अनुषंगाने कारवाई; बेकायदेशीर दारू विक्रीवर लोणावळा पोलिसांचा छापा
लोणावळा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून लोणावळा शहरात कोठे अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्यावर कारवाई करण्याच्या सूचना लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिल्या आहेत. या सुचनेच्या अनुषंगाने तुंगार्ली बीट मध्ये पोलीस उपनिरीक्षक केरूरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल शकील शेख, देविदास चाकणे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश उगले हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाले की तुंगार्ली हद्दीमध्ये टाटा ऑफिस जवळील अशोका हॉटेल जवळ डक्ट लाईनच्या भिंतीलगत आडोशाला एक व्यक्ती आपल्या ताब्यामध्ये बेकायदा बेकायदेशीर देशी दारू बाळगत विक्री करत आहे. त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता त्या व्यक्तीकडे देशी दारू टॅंगो पंचच्या 33 बाटल्या मिळून आल्या आहेत. सदर व्यक्ती व दारू जप्त करण्यात आली असून याप्रकरणी लोणावळा शहरचे हेड कॉन्स्टेबल शकील शेख पुढील तपास करत आहेत.