Breaking news

Accident News : पोकलॅनसह ट्रेलर कामशेत खिंडीतील दरीत पलटी झाला

कामशेत : पोकलॅन वाहन घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार्‍या ट्रेलरचे स्टेअरिंग अचानक लाॅक झाल्याने ट्रेलर रस्ता दुभाजक तोडत विरुद्ध लेनवरून खोल दरीत पडला तसेच ट्रेलरवरील पोकलॅन देखील खाली पडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. कामशेत खिंडीत मंगळवारी पहाटे हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रेलर चालक आझाद पकडुनट अली ( वय 25, रा. उत्तरप्रदेश ) याने फिर्याद दिली आहे.

   कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.23) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कामशेत हद्दीतील कामशेत खिंडीत येथे चाकण हून मुंबईकडे पोकलॅन मशीन घेऊन निघालेल्या ट्रेलरचे ( क्र. एमएच 46 बीएम 9081) स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने हा भीषण अपघात घडला. कामशेत खिंडीतून ट्रेलर खाली पडला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. कामशेत पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलीस हवालदार समीर शेख यांनी दिली.

इतर बातम्या