Breaking news

Maval Accident : साते गावाजवळ पायी पालखीमध्ये टेम्पो घुसल्याने अपघात; 4 महिला वारकर्‍यांचा मृत्यू तर 23 वारकरी जखमी

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोणावळा : मावळ तालुक्यातील साते गावाजवळ आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आळंदीकडे पायी जाणार्‍या पालखीमध्ये भरधाव वेगातील टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात 4 महिला वारकरी मृत्यूमुखी पडल्या असून सुमारे 23 वारकरी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले म्हणाले जखमी विविध रुग्णालयात असल्याने त्यांनी माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. प्रथम सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

       खालापूर तालुक्यातील उंब्रे, कर्जत, खालापूर, खोपोली भागातील 200 वारकरी या पायी पालखीमध्ये होते. पहाटेच्या सुमारास माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट उंबरे खालापुर ही पालखी आळंदीकडे जात असताना साते गावाजवळ सदरचा भिषण अपघात झाला आहे. अपघातानंतर टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

     या अपघातामध्ये सविता वाळकू येरभ (वय 58, रा. उंबरे, खालापूर, रायगड) व जयश्री आत्माराम पवार (वय 54, रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड) यांचा मृत्यू झाला असून मंदा बापु वाघमारे, वनिता बबन वाघमारे, रंजना गणेश वाघमारे, राजश्री राजेश सावंत (सर्व राहणारे उंब्रे गाव खालापुर), सुरेखा तुळशीराम कर्णक, वंदना राम कर्णक, माणिक कर्णक (तिघेही राहणार बीड खुर्द), शोभा सावंत, पुष्पा पालकर, अनुसया जाधव, बेबी कदमुख, अनुसया मधुकर जाधव, दिव्या दीपक धंदावकर, आशा साबळे, रामदा आहेर, सोनाबाई धोरगे, पुष्पांजली कर्णक, सुभद्रा सिताराम शिंदे, बेबी सावंत, दिव्या चांदूरकर, सुभद्रा सदाशिव चोरगे, रंजना अशोक कर्णक, राधिका बाळकृष्ण भगत हे जखमी झाले आहेत.

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कर

दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान या अपघातातील तीसरी महिला सुरेखा चोरघे (बीड) यांचे व चौथी महिला संगिता वसंत शिंदे (साळोख) यांचे देखील निधन झाले आहे.

इतर बातम्या