Breaking news

जागतिक चिमणी दिवस । मोरवे शाळेतील विद्यार्थ्यांचा "पक्षांना अन्नपाणी" हा अनोखा उपक्रम

पवनानगर : जागतिक चिमणी दिनानिमित्त मावळातील तालुक्यातील डोंगराळ भागातील जिल्हा परिषदेच्या मोरवे शाळेत मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी "पक्षांना अन्नपाणी" ही संकल्पना मांडली. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरावर अथवा घराच्या परिसरात असलेल्या झाडावर मडके, प्लॅस्टिकचे व इतर भांडे बांधून त्यामध्ये नियमित पाणी भरून ठेवणे तसेच पक्षांना धान्य ठेवायला सांगितले. गेली बारा वर्षांपासून सर्जेराव पाखरे हा उपक्रम राबवितात. 

     मोरवे शाळेत मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे त्यांना शासन व सामाजिक संस्थाकडून अनेक वेळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. पक्षांना अन्नपाणी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यी व पालकांत कुतुहल निर्माण झाले आहे. उपक्रमाचे उद्घाटन पोलीस पाटील संतोष मानकर, लहु गोणते, दिपक फाटक, सोनु वांजळे, बाबू भिकुले, तनिष्का प्रेरणा प्रतिष्ठान च्या अध्यक्षा अन्नपूर्णा पाखरे इत्यादी उपस्थित होते. तर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी या उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या