Breaking news

Accident Breaking l शिव वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महेश केदारी यांच्या गाडीला टेम्पोची धडक

लोणावळा : शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख तथा शिव वाहतूक सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य महेश केदारी यांच्या वाहनाचा नवी मुंबई घणसोली येथे भीषण अपघात झाला आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोची केदारी यांच्या मारुती विटारा ब्रिजा कारला जोरदार धडक दिली व पुढे जाऊन तो पलटी झाला आहे. या अपघातात केदारी यांना किरकोळ मार लागला आहे. 

     मिळालेल्या माहितीनुसार केदारी हे आज सकाळी त्यांची लाल रंगाची कार क्र. (MH 14 HK 0679) मधून मुंबई च्या दिशेने जात असताना घणसोली येथे मागून भरधाव वेगाने आलेला टेम्पो क्र. (MH 04 KX 7584) ची कारला जोरदार धडक बसली व टेम्पो पुढे जाऊन पलटी झाला आहे.

इतर बातम्या

कोकणातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. शेखर निकम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीची भेट; चिपळूण शहरातील विविध समस्या बाबतही दिले निवेदन