Breaking news

CNG Andolan : आधीच CNG ची बोंब त्यात दरवाढीचा लोड; लोणावळ्यात CNG दरवाढीच्या विरोधात भरपावसात धरणे आंदोलन

लोणावळा : केंद्र व राज्य शासनाच्या आवाहनाला साथ देत सर्वत्र नागरिकांनी सीएनजी वाहने खरेदी करण्यावर भर दिलेल्या असताना मागील काही दिवसांपासून सुरू असलेली सीएनजी दरवाढ सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडू लागली आहे. एकीकडे सीएनजी ची बोंब त्यात दरवाढीला लोड असं म्हणण्याची वेळ आली. या सीएनजी दरवाढीच्या विरोधात आज लोणावळा शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात धरणे आंदोलन करण्यात आले. लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी पर्यटनावर अवलंबून असलेला रिक्षा व टुरिस्ट टॅक्सीचा व्यावसाय करणारे अनेक तरुण आहेत. काहीजण पिडीजात हा व्यावसाय करत आहे. पेट्रोल व डिझे वाहनांचा चांगला पर्याय म्हणून सीएनजी वाहनांना शासनाने प्रोत्साहन दिल्याने अनेकांनी पेट्रोल व डिझल वाहने विकून सिएनजी वर चालणार्‍या रिक्षा व टुरिस्ट गाड्या घेतल्या. सर्वसामान्य कुटुंबातील अनेकांनी सीएनजी बजेटला परवडणारा असल्याने सीएनजी वाहने घेतली काहींनी पेट्रोल वाहनांना सीएनजी किट बसवून घेतले. सहा महिन्यापुर्वी 65 रुपयांवर असलेला सीएनजी आता मात्र डिझेलच्या दरा ऐवढा झाला आहे. आज मितीला सीएनजी चे दर 92 रुपये झाले आहेत. लोणावळा शहरात सीएनजी वर चालणारी काही हजार वाहने असताना शहरात सीएनजी चा एकही पंप नाही. सीएनजी भरण्यासाठी वाहन चालकांना कार्ला, कामशेत अथवा खोपोलीला जावे लागत आहे. त्याठिकाणी देखील सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने त्याठिकाणी दोन दोन तास थांबून सीएनजी भरावा लागत असल्याचे कविश्वर यांनी सांगितले. सीएनजी चा दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य वाहन चालकांना होत असलेला त्रास याची जाणिव शासनाला व्हावी याकरिता हे धरणे आंदोलन केले असल्याचे निखिल कविश्वर यांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनाने याकडे गांभीर्यांने लक्ष देत सीेएनजी ची भाववाढ कमी करावी तसेच लवकरात लवकर लोणावळा शहरात सीएनजी पंप सुरू करावा अन्यथा शासनाच्या विरोधात तिव्र स्वरुपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कविश्वर यांनी दिला आहे. लोणावळ्यातील या धरणे आंदोलनाला लोणावळा व खंडाळा परिारातील तसेच ग्रामीण भागातील टॅक्सी व रिक्षा चालक संघटना तसेच कष्टकरी संघटना यांनी पाठिंबा दिला. 

इतर बातम्या