Breaking news

कार्ला परिसरात गौरी व गणपतीला नियमांचे पालन करत भावपूर्ण निरोप

 कार्ला (प्रतिनिधी) : सलग दुसऱ्या वर्षी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणरायाला निरोप देताना कुठल्याही प्रकारची मिरवणुक न काढता गर्दी न करता मर्यादित भक्त  "गणपती बाप्पा  मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशी विनवनी करत तसेच एक दोन तीन चार कोरोनाला करु हद्दपार अशा घोषणा देत गणेशभक्तानीं मंगलमय वातावरणात या वर्षी आलेल्या पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे व गौराईचे विसर्जन केले.

    कार्ला परिसरातील मळवली, भाजे, पाटण, बोरज, देवले, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे, वाकसई, देवघर, सदापूर या ग्रामीण भागातील घरोघरी बसलेल्या गणरायांचे विसर्जन शांततेमध्ये करण्यात आले. विशेष म्हणजे यावर्षी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, सहाय्यक निरीक्षक सचिन बनकर, बीट अमंलदार गणेश होळकर, पोलीस पाटील संजय जाधव यांच्या आहवानाला प्रतिसाद देत गर्दी टाळण्यासाठी कार्ला येथील गावातील घरोघरी बसलेल्या गौराई व गणपती  विसर्जनासाठी कार्ला ग्रामपंचयात व कार्ला ग्रामस्थांकडून संपूर्ण गावामध्ये  जनजागृती करत चार टेम्पो व ट्रॅक्टर फिरवून सर्व गौराई व गणपती टेम्पोमध्ये ठेऊन सर्व गौराईं गणपती यांचे धार्मिक पध्दतीने पुजा करुन फक्त दोन तासात युवकांनी गणपती व गौराईचे विसर्जन करण्यात आले. एकही महिला व लहान मुले विसर्जन घाटावर आले नव्हते.

इतर बातम्या