Breaking news

Expressway Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरने दिली कारला धडक; एक जण जागीचा ठार

खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास किमी 39/800 जवळ कंटेनर व इंर्टीगा कार यांच्या झालेल्या भिषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. परशुराम कुंडलिक आंधळे (वय 24, रा. लिंबोडीकर, ता. आष्टी, जिल्हा बिड) असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर क्र. MH 43 Y 5841 हा तिव्र उतारावर असताना त्याचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कंटेनर समोर जाणारी इंर्टीगा गाडी क्र. MH 43 BU 2145 ला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.  कंटेनर रोडच्या बाजुला उलटल्याने कंटेनर चालकाने गाडीतून बाहेर उडी मारली, दुर्दैवाने तो त्याच गाडीखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर बोरघाट पोलीस, आयआरबी  पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य रुग्णसेवा, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजुला घेतली.

इतर बातम्या