Breaking news

Maval Crime News : ओ… तुमच्या गाडीच्या चाकात हवी कमी आहे… असे सांगत वाहनचालकांना लुटणार्‍या पंक्चर टोळीवर गुन्हा दाखल

वडगाव मावळ : तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगून पंक्चर दुकानदार टोळीकडून वाहन चालकांची फसवणूक करुन 9,400 रुपयांची आर्थिक लूट व नुकसान केल्याची घटना  सोमवारी (दि.27) रात्री 9 वा. जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत शितल हॉटेल समोर शहानवाज टायर शॉप, वडगाव ता. मावळ जि. पुणे हद्दीत घडली. 

      पियुष अशोककुमार आरोरा (वय 29, रा. सी. विंग आँरचिड लोढा गोल्डन ड्रिम कोनीगाव डोबिवली,(E) ठाणे यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी फिर्याद दिली. यानुसार अब्दुल रहिम राशिद, राशीद अब्दुल रहिम अली रा. वडगाव मावळ, मूळ राहणार कानपूर उत्तर प्रदेश) व इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पियुष अशोककुमार आरोरा व संतोष आण्णाराव बनसोडे वय 29, बोराळे ता.मंगळवेढा जि.सोलापुर) हे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना, दुचाकीवरून अनोळखी दोन तरुण आले व तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगून निघून गेले. म्हणून ते शहानवाज टायर शॉप, वडगाव ता. मावळ येथे गेले असता, पियुष आरोरा यांच्या TS 08 HE 2089  दुचाकीचे पंक्चर  नसताना 1500 रुपये पंक्चर काढल्याचे व टायर चे 3500 एकूण 5000 रुपयांचे नुकसान व फसवणूक व संतोष बनसोडे यांच्या MH 13 DK 9370 दुचाकीचे पंक्चर नसताना 400 रुपये पंक्चर काढल्याचे व टायर चे 4000 रुपयांचे नुकसान व फसवणूक केली आहे.

      पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड, सोमाटणे, वडगाव, वरसोली आदी ठिकाणी पंक्चर टोळी कार्यरत आहेत. बाहेर च्या दुचाकी व चारचाकी ओळखून त्यांच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगून फसवणूक व नुकसान केले जाते आहे. याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होती. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोलीस अंमलदार मनोज कदम, सिद्धार्थ वाघमारे, गणपत होले, आशिष काळे आदींनी या प्रकरणाचा छडा लावला. आरोपींवर भाग भा.दं.वि.सं.क 420,417,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात रवाना करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अजित ननवरे करत आहेत.

इतर बातम्या