Breaking news

Lonavala News l लोणावळ्यात तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा तुंगार्ली भागातील एका बंगल्यात पैशांची दर्शनी किंमत असलेल्या कॉइन चा वापर करत तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या 14 जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार खेळणारे सर्व जण मुंबई भागातील आहेत. त्यांच्याकडून 2 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणावळा शहरचे पोलीस शिपाई विकास कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 14 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतीबंधक अधि. 12 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. 10 ऑगस्ट रोजी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

        तुंगार्ली भागातील एका सोसायटी मधील बंगल्यात काही लोक पैशाची दर्शनी किंमत असलेल्या कॉईन चा वापर करून तीन पत्ती जुगार खेळत असलेली माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी पडताळणी केली असता मुंबई भागातील 14 जणांचा एक ग्रुप त्या ठिकाणी जुगार खेळत असल्याचे मिळून आले आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे हे पुढील तपास करत आहेत. 




इतर बातम्या