Breaking news

लोणावळा शहरात मंगळवारी 24 तासात 55 मिमी तर पवना परिसरात 40 मिमी पाऊस; पवना धरणात 91 टक्के पाणीसाठा

लोणावळा : लोणावळा शहरात मंगळवारी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. दिवसभरात शहरात 55 मिमी पाऊस नोंदविण्यात आला असून पवना धरण परिसरात 40 मिमी पाऊस झाला. यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणीसाठा 91.46 टक्के इतका झाला आहे.

     1 जुन पासून आजपर्यंत लोणावळा शहरात 3279 मिमी (129.09 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजपर्यंत शहरात निम्म्यांहून कमी म्हणजेच 1591 मिमी (62.64 इंच) पाऊस झाला होता.

    पवना धरण परिसरात 1 जुन पासून आजपर्यंत 1941 मिमी ( 76.41 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात दोन महिन्यात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मावळातील धरणे व पाणीसाठा 

आंद्रा 100 टक्के, वडिवळे 81.28 टक्के, कासारसाई 89.79 टक्के, टाटा कंपनीचे ठोकळवाडी 63.52 टक्के, वलवण धरण 64.35 टक्के, शिरोटा 58.41, लोणावळा धरण 41.64 टक्के.

इतर बातम्या