Breaking news

Pawna Dam : पवना धरणात 28 टक्के पाणीसाठा; 24 तासात धरणातील पाणीसाठ्यात 4 टक्क्यांनी वाढ

पवनानगर : मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होऊ लागली आहे. मागील 24 तासात पवना धरणाच्या पाणीसाठ्यात 3.88 टक्के वाढ झाल्याने धरणात 27.77 टक्के पाणीसाठा झाला आहे. गत 24 तासात धरण क्षेत्रात 105 मिमी पाऊस झाला आहे. यावर्षी 1 जुन पासून आजपर्यंत धरण परिसरात 650 मिमी पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी आजपर्यंत 572 मिमी पाऊस झाला होता.

इतर बातम्या