Pawna Dam l पवना धरणात 21 टक्के पाणीसाठा; मागील 24 तासात 40 मिमी पावसाची नोंद
मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुका सह पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरणात आज मितीला 21% पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाने जून महिन्यात मोठी ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा तळाला गेला होता. सध्या पावसाचे दिवस सुरू असले तरी पवना धरण परिसरात पर्जन्यमान कमी झाले आहे. पुढील काही दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याने पवना जलाशयातील पाणीसाठा समाधान कारक वाढ होईल. शनिवारी 6 जुलै रोजी 24 तासात धरण परिसरात 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आजपर्यत धरण क्षेत्रात 401 मिमी पाऊस झाला आहे.