Breaking news

Maval Corona News : मावळ तालुक्यात आज सोमवारी कोरोनाचे 188 नविन रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या 1268

वडग‍ाव मावळ : मावळ तालुक्यात आज सोमवारी (24 जानेवारी) कोरोनाचे 188 नविन रुग्ण मिळून आले असून कोरोनावर मात केलेल्या 175 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे मावळातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 1268 झाली आहे.  

       मावळ तालुक्यातील तळेगाव शहरात 747, लोणावळा शहरात 99, वडगाव मध्ये 59 व ग्रामीण भागात 363 रुग्णांचा समावेश आहे. मावळ तालुका आरोग्य विभागाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेली ही आकडेवारी आयसीएमआर कडून प्राप्त झालेल्या अहवालावरून देण्यात आली आहे.

         मावळ तालुक्यात आतापर्यत कोरोनाचे एकूण 30672 रुग्ण झाले असून यापैकी 28879 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर आजपर्यत मावळात 525 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.15 टक्के असून सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 4.13 टक्के व मृत्यूदर 1.71 टक्के इतका आहे. मावळ तालुक्यात शहरी भागात आज 253 तर ग्रामीण भागात 73 रुग्ण मिळून आले आहेत. मावळ तालुक्यातील 33 गावांमध्ये कोरोना रुग्ण आहेत.

महत्वाची सूचना

24-01-2022 दैनंदिन अहवालात 326 असणारी वाढ : ICMR ID UPDATION, निवास पत्ता व इतर अहवाल पडताळणीनंतर हा आकडा निश्चित करण्यात आलेला आहे. आजचा अहवाल 188 असून मागील 04  दिवसातील 138 संख्या आहे. त्यामुळे आजच्या अहवालातील असलेले सर्व 326 हे आजच्या दिनांकाला आलेल्या COVID19 +ve ची संख्या नाही. याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

इतर बातम्या