Breaking news

Maval Corona News : मावळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोनाचे 185 नविन रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या 1331

वडग‍ाव मावळ : मावळ तालुक्यात आज मंगळवारी (25 जानेवारी) पुन्हा कोरोनाचे 185 नविन रुग्ण मिळून आले असून कोरोनावर मात केलेल्या 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे मावळातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 1331 झाली आहे.  

       मावळ तालुक्यातील तळेगाव शहरात 838, लोणावळा शहरात 109, वडगाव मध्ये 58 व ग्रामीण भागात 326 रुग्णांचा समावेश आहे. मावळ तालुका आरोग्य विभागाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेली ही आकडेवारी आयसीएमआर कडून प्राप्त झालेल्या अहवालावरून देण्यात आली आहे.

         मावळ तालुक्यात आतापर्यत कोरोनाचे एकूण 30857 रुग्ण झाले असून यापैकी 28001 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर आजपर्यत मावळात 525 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 93.99 टक्के असून सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 4.31 टक्के व मृत्यूदर 1.70 टक्के इतका आहे. मावळ तालुक्यात शहरी भागात आज 169 तर ग्रामीण भागात 16 रुग्ण मिळून आले आहेत. मावळ तालुक्यातील 33 गावांमध्ये कोरोना रुग्ण आहेत.

इतर बातम्या